श्री महालक्ष्मी जगदंबा

देवी आई

महाराष्ट्रातील नागपूर मध्ये कोराडी येथे देवी लक्ष्मी समर्पित कोराडी माता मंदिर हे लोकप्रिय आहे. नागपूर शहर पासून सुमारे १५ किमी अंतरावर तसेच कोराडी तलावाच्या काठावर कोराडी देवी मंदिर स्थित आहे. नवरात्रीच्या काळात मंदिरात महत्वाची पूजा आणि उत्सव साजरे केले जातात. लाखो श्रद्धाळू या उत्सवा दरम्यान श्री महालक्ष्मी जगदंबा मातेचे दर्शन घेण्यास येतात. देवी लक्ष्मीची मुकुट घातलेली विशाल मूर्ती शोभून दिसते. पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाख आणि साडी व असंख्य दागिने देवीला सजवतात. मूर्ती चे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड सहृदय चेहरा आणि प्रेमळ आई.

नवरात्रौत्सवा दरम्यान आई चे रूप तीन विविध टप्प्यात दिसते. सकाळी लहान मुलगी, दुपारी तरुण मुलगी आणि रात्री एक स्त्री म्हणून असे तिचे विविध रूप दिसतात. १००००० पेक्षा अधिक भाविक कोराडी देवी यात्रा नवरात्रौत्सव साजरा (ऑक्टोबर ते सप्टेंबर) करण्यास सहभागी होतात. मंदिरात सर्वात महत्वाचे अर्पण नारळ, लिंबू, लाल कपडे आणि इतर आरती साहित्य आहे.

©2018 सर्व अधिकार आरक्षित-श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी.