श्री महालक्ष्मी जगदंबा

इतिहास

पूर्वी कोराडी हे जाखापुर या नावाने ओळखले जात असे.जाखापुरचा राजा झोलन ह्याला सात पुत्र होते - जनोबा, नानोबा, बानोबा, बैरोबा, खैरोबा, अग्नोबा आणि दत्तासूर. परंतु कन्यारत्न एकही नसल्याने राजा दु:खी होते. राजाने यज्ञ, हवन, पूजा, तपश्चर्या करुन देवाना प्रसन्न करुन एक कन्यारत्न मागितले. दिव्य, पवित्र व तेजोमय रुपगुणसम्पन्न कन्येच्या रुपाने अवतरलेल्या आदिमायेच्या अनेक दिव्य अनुभूती राजाला येत असत. तिने राजाला अनेक कठीण प्रसंगात मार्गदर्शन करुन योग्य निर्णयाप्रतपोहचविले. एका युद्ध प्रसंगी तिने राजाच्या शत्रुविषयी देखीलयोग्य निर्णय देऊन न्यायप्रियतेचे दर्शन घडविले.राजाला आदिमायेच्या दिव्य शक्तीचा पुन:प्रत्यय आला. अवतारकार्य पूर्ण झाल्यामुळे सूर्य मावळल्यानंतर देवी ज्या स्थानी विराजमान झाली ते ठिकाण म्हणजे जाखापूर साक्षात शक्तीपीठ आहे. आई जगदंबेची मूर्ती स्वयंभू आहे.

मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. त्यावरुन मंदिराची प्राचीनता लक्षात येते. भारतीय जीवनाचे आधारस्तंभ - धर्म, अर्थ, काम, मोक्ष - ह्या चारही पुरुषार्थात देवीच्या दर्शनाने यश मिळ्ते अशी भक्तांची श्रद्धा आहे.

©2018 सर्व अधिकार आरक्षित-श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी.