जय जय विश्वपते, हिमाचलसुते सत्यव्रते भगवते ।
वच्छा कल्पकते, कृपार्णव धृते,भक्तांकिते, सन्मते।।
साधू वत्सलयते ,अधर्मरहिते , सद्धर्म श्रीपालके ।
साष्टांगें करितो प्राणांम चरणा, जयजय महाकालिके।।१।।
अष्टदंडभुजा प्रचंड सरळा, विक्राळ दाढा शुळा ।
रक्त श्रीबुबुळा प्रताप अगळा, ब्रह्याडं माळा गळां ||
जिव्हा ऊरस्थळा,| रुळे लळलळा,कल्पांत कालांतके।
साष्टांगे करितो प्रणाम चरणा, जयजय महाकालिके ||२।।
कोटीच्या शतकोटी बाण सुटती, संग्राम प्राणापणे ।
तेवी रूप प्रचंड देख भ्रमंती, मार्तंड तारांगणे ।।
सोडिले तव सुप्रताप पाहता, गर्वास श्रीत्र्यंबके ।
साष्टांगे करितो प्रणाम चरणा, जयजय महाकालिके ।।३।।
युध्दीं चाप करी फिरे गरगरा, चक्रापरी उद्धिटा ।
आरोळी फुटता धरा थरथरा, कांपे उरी तटतटा ।
साक्षात काळ पळे बहू झरझरा, धाकें तुझ्या अंबिके ।
साष्टांगे करितो प्रणाम चरणा, जयजय महाकालिके ।।४।।
अंगीं संचारत सकोप उठती, ज्वाला मुखीं भडभडा।
भूमी आदहतां द्विपाद उठती, शैले-मुळे तडतडा।।
चामुंडे उररक्त तूं घटघटा, महिषासुर प्राशके।
साष्ठांगे करितों प्रणाम चरणा, जयजय महाकालिके ।।५।।
आशापाश नको, जगीं भीक नको, पदरद्रव्य दारा नको।।
कायाक्लेश नको, द्या यजुं नको निर्वा पाहूं नको
कामक्रोध नको, महारीपू नको, निंदा नको या मुखें ।
साष्ठांगे करितों प्रणाम चरणा, जयजय महाकालिके ।।६।।
त्वद् भक्ती मज दे,भवानी वर दे, पायी तुझ्या राहूं दे ।
सद्धर्मी माती दे, भवानी वर दे, पायी तुझ्या राहूं दे ।
धैर्य श्री बाल दे, प्रपंचि सुख दे , विघ्ने दुरी जाउं दे ।।
साष्ठांगे करितों प्रणाम चरणा, जयजय महाकालिके ।।७।।
स्वापत्या छळणें कृपा विसरणें, अश्लाघ्य की न्याय हें हा ।।
तझ्या तूंचि पहा विचार करुनी, अन्याय कि न्याय हा||
विष्णुदास म्हणे कृपेची करणे, आतां जयन्नायके ।
साष्ठांगे करितों प्रणाम चरणा, जयजय महाकालिके ।।८।।