अश्विनशुद्धपक्षी, अंबा बैसली सहासनी हो ।
प्रतिपदेपासुन, घटस्थापना ती करूनी हो ।
मलमंत्रजप करूनी, भोवते रक्षक ठेउनी हो ।
ब्रम्हाविष्णूरूद्र, आईचे पूजन करती हो ॥१॥
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिला धो ।।धृ ।।
द्वितीयचे दिवशी, मिळती चौसष्ट योगिनी हो ।
सकळांमध्ये श्रेष्ठ, परशुरामाची र्जननी हो ।
कस्तुरीमळवट, भांगी शेंदूर भरूनी हो ।
उदोकारें गर्जती सकल चामुंडा मिळुनी हो ।।उदो ०।।२।।
तृतीयेचे दिवशी अंबे शृगांर मांडीला हो।
मळवट पातळ चोळी, कंठी हार मुक्ताफळा हो ।
कंठीचे पदके कासे, पीतांबर शोभे पिवळा हो ।
अष्टभुजा मिरवती, अंबे सुंदर दिसे लीला हो।।उदो ०॥ ३॥
चतुर्थीचे दिवशी विश्व् व्यापक जननी हो।
उपासका पाहसी, अंबे प्रसन्न अंत:करणी हो ।
पर्णकृपें पाहसी जगन्माते मनमोहहनी हो ।
भक्तांच्या माऊली, सुर ते येती लोटांगणी हो।।उदो ० ।।४॥
पंचमीचे दिवशी, व्रत ते उपांगललिता हो ।
अध्यपाद्यपूजनें तुजला भवानी स्तवितो हो ।
रात्रीचे समयी, करीती जागरण हरीकथा हो ।
आनंदे प्रेम ते, आले सद्भावे क्रीडता हो ।।उदो ०।।५॥
षष्ठीचे दिवशी, भक्ता आनंद वर्तला हो ।
घेऊनी दिवड्या हस्ती, हर्षेगोंधळ घातला हो ।
कवडी एक अर्पित, देसी हार मुक्ताफला हो ।
र्जोगवा मागता प्रसन्न झाली भक्तकुळा हो ।।उदो ०।।६॥
सप्तमीचे हदवशी, सप्तश्रंगृगडावरी हो ।
तेथे तणनांदसी, भोवती पुष्पे नानापरी हो ।
तेथे तू नांदसी भोंवती पुष्पे नानापरी हो |
जाईजुई शेवंती रेखीयली बरवी हो ।
भक्त संकटी पडता, झेलुनी घेसी वरचेवरी हो।।उदो ०।।७॥
अष्टमीचे दिवशी, अष्टभुजा नारायणी हो ।
सह्य्राद्रीपार्वतीं , पाहली उभी जगज्जननी हो ।
मन माझे मोहीले, शरण आलो तुजलागुनी हो ।
स्तनपान देऊनी, सुखी केले अंतःकरणी हो।।उदो ०।।८॥
नवमीचे दिवशी, नवदिवसांचे पारणे हो ।
सप्तशतीजप , होमहवने सद्भक्ती करुनी हो
। षड्ररस अन्ने नैवेद्यासी, अर्पियले भोजन हो ।
आचर्या ब्राह्मणा , तप्तृ केले त्वा कृपक रुनी हो।।उदो ०।।९॥
दशमीच्या दिवशी, अंबा निघे सिमोल्लंघनी हो ।
सिहारूढ दारुण शस्त्रे अंबे त्वा घेऊनी हो ।
शुंभनिशुंभदिक राक्षसा, किती मारीसी रणा हो ।
विप्र रामदासा, आश्रय दिधलातो चरणी हो।।उदो ०।।१०॥