दे मज आशीर्वाद, अंबे दे मज आशीर्वाद

छत्र सिहासनी आंब बसुनी,

कशी करू मी पूजा येऊनी

लावू आरती यात

अंबे दे मज आशीर्वाद।।१।।

तुझा ध्व नी हा मंदिरी घुमता

आतुरले मी वदनी पाहतो

सुख वाटे मज फार

अंबे दे मज आशीर्वाद।।२।।

एका जनार्दनी पूर्ण कृपेने

भक्त गर्जती अति प्रेमाने

मस्तकी ठेवूनी हात

अंबे दे मज आशीर्वाद।।३।।

शेवटी करतो नम्र प्रणाम

वंदनीय अंबा भवानी नाम

ठेवू तू शिरावर हात

अंबे दे मज आशीर्वाद।।४।।

Mandir Timings