तुळजापूर हे पठार जागा. नांदे शिव शक्ती
अंबे हो नांदे शिवशक्ती ।
दर महिन्यातून मेहा यात्रा, आटोपाट भरती ।
अें हो आटोपाट भरती ।
गाओ गावचे भक्त अंबेच्या दर्शनास येती। अंबेच्या दर्शनास येती।
कल्लोळाची आंघोळ करुनी बाहेर निघती । अंबे बाहेर निघती ।
गाय – मुखाची धार घेउनी, वस्त्र नेसती । अंबे वस्त्र नेसती ।
घेऊन अंबेचे दर्शन आपआपले बिऱ्हाडास जाती ।।१।। तुळजापूर ….. ।।धृ.।।
पुनवेच्या दिवशी, नैवेद्य आरत्या करिती। अंबे हो आरत्या करीती |
चावलीचे गोधंळ, फार नाचती । त्यास काही गिनती । आंबे हो त्यास गिनती ।
असे अंबे गं नाव तुझे वर्णावे किती, अंबे हो वर्णावे किती।
छबीदास येऊनी अंबेच्या दर्शनासी जाती ।।२।। तुळजापूर… ।।धृ.।।
अखंड दिवसामध्ये अंबेवर गहिना घालती । अंबे हो गहिना घालती।
हनुवटी छिल्या पायी पोलादी पाय भरुनी येति, अंबे हो पाय भरुनी येति।
हातात चुडा, माळ पट्टा, वेणी शोभती, अंबे हो वेणी शोभती।
कानी कर्णफुले आणि बजवल्या मोती लावती, अंबे हो मोतीलावती ।
त्रिविकराळी रूप अंबा देवी या शक्ती हो माता देवि या शक्ती ।।३।।
तुळजापूर ….. ।।धृ.।।
डोंराच्याआड अंबेचे माहेर सिंदखेड, अंबे हो माहेर सिंदखेड।
वर्ष दिवाळीला उभी राहे घाट शिवावर, अंबे हो घाट शिवावर।
मिराजीने घाट बांधिले, बांधिले थोर, अंबे हो बांधिले थोर।
तरी पायऱ्या आणि दीपमाळ, तेथे होमाचे शीर, अंबे हो होमाचे शीर।
तुळजापूरच्या ठाण्यामध्ये राहे निमूळकर, अंबे हो राहे निमूळकर।
तेथेचा पैसा वसूल करुन नेता मोगल, अंबे हो नेता मोगल।
अशी आरती गातो आम्ही नटवान थटवान, अंबे हो नटवान थटवान ।।४।।