अंबा एक करी उदास न करी । भक्तासी हाती धरी ।
विघ्न दूर करी । स्वधर्म उध्दरी । दारिद्र्यमाझे हरी चित्ति मूर्ती धरी ।
पूजा वर करी ।ध्यातो तुला अंतरी ।
वाचा शुध्द्व करी ।विलंब न करी ।
पावे त्वरे सुन्दरी । माते एक विरे ।मला तू वरदे ।
हे तू द्या सागरे । माझा हेतू पुरे ।
मनातन उरे । संदेह माझा हरे ।
जेणें पाप सारे । कुबुद्धी विसरे ।
ब्रह्यैक्य धरित्री संचरे ।देवी पूर्ण भरे।
भयायु बुद्धी तरे । ऐसे करावे त्वर ।
अनाथासी अंबा । नको विसरू गं।
भव : सागरे सांग मी कैसा करू गं ।
अन्याय जरी मी । तुझे लेकरू गं ।
नको अंबिके ।दैन्य माझे करू गं ।
मुक्त फले । कुंकुम पाठ लागें ।
संदेह तारा न कळेल वाचा ।
श्री. मूल पिठां चळचुळी कायाम्।
त्वामे एकविरा ।शरणम् प्रदद्दे ।
सखे दुखिताला नको दाखवू गं ।
दिना बालकाला नको हाकलू गं।
हे ब्रीद तु रक्षी । श्री भवानी ।
प्रार्थनास ऐकोनि कैवल्यदानी ।
आनंदी वाचा श्री जगदंबापर्णनस्तु ।
त्वमेय माता च पिता त्वमेव
त्वमेव बधुश्व सखा त्वमेव
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सार्वमय देव देव
पापो हं पाप कर्मणा पापात्मां पाप संभवा
त्राही मां अंबे सर्व पाप हरे
गतं पापं गतंदुःखी गतं दारिद्य मेव च
आगता सुख संपत्ती पुण्याय समक्ष दर्शना